Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एआयच्या मदतीने मधुमेहाचे होणार निदान

एआयच्या मदतीने मधुमेहाचे होणार निदान

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन संशोधकांनी एक नवीन उपकरण तयार केले आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण करेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने भविष्यात त्या व्यक्तीला टाइप १ मधुमेह होण्याचा किती धोका आहे हे शोधून काढेल.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी हे उपकरण तयार केले आहे. हे उपकरण केवळ टाइप १ मधुमेह होण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करत नाही तर एखाद्या व्यक्तीचे शरीर रोगाच्या उपचारांना कसे प्रतिसाद देईल हेदेखील सांगू शकते. हे उपकरण डायनॅमिक रिस्क स्कोअरचा वापर करते, जे एखाद्या व्यक्तीला टाइप १ मधुमेह आहे की नाही हे सांगते. हे उपकरण मायक्रोआरएनएवर आधारित आहे. रक्तात आरएनएचे खूप लहान तुकडे असतात, जे टाइप १ मधुमेहाचा धोका शोधण्यात मदत करतात.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिन अँड ट्रान्सलेशनल हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आनंद हर्डीकर म्हणाले, टाइप १ मधुमेहाचा धोका आधीच जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. संशोधन लेखानुसार भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, हाँगकाँग, न्यूझीलंड आणि अमेरिकासारख्या देशांमधील सुमारे ५,९८३ लोकांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यानंतर संशोधकांनी हा स्कोअर योग्यरीत्या काम करत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आणखी ६६२ लोकांवर त्याची चाचणी केली. उपचार सुरू केल्यानंतर फक्त एक तासाने स्कोअरने अंदाज लावला की, टाइप १ मधुमेह असलेले कोणतेही लोक इन्सुलिनशिवाय बरे होऊ शकतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!