Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टीम इंडिया पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार , यावेळी रोहित आणि विराटही दिसण्याची शक्यता

टीम इंडिया पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार , यावेळी रोहित आणि विराटही दिसण्याची शक्यता

लंडन: टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढील वर्षी इंग्लंडमध्ये खेळताना क्रिकेट चाहते पाहू शकतात. टीम इंडिया 2026 मध्ये इंग्लंडमध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी 24 जुलै रोजी आपल्या देशांतर्गत सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ १ जुलै २०२६ पासून इंग्लंडमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतात. टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, ज्यात ते अजूनही पिछाडीवर आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 1 जुलै 2026 रोजी डरहॅम येथे, तर एकदिवसीय मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होईल. कसोटी क्रिकेट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे मध्ये खेळताना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळतात.

इंग्लंडचा उन्हाळा न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांनी सुरू होईल, त्यानंतर जुलैमध्ये भारताविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तान तीन कसोटी, सप्टेंबरमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सूर्यकुमार यादवकडे टी-२० संघाचे नेतृत्व
टीम इंडियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव करू शकतो. रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करेल की नाही याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच निर्णय घेऊ शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात परतण्याची प्रतीक्षा वाढत चालली आहे. बांगलादेश दौरा पुढे ढकलल्यानंतर टीम इंडियाकडे सध्या एकही वनडे सामना नाही. यंदा टीम इंडियाला 6 वनडे सामने खेळायचे आहेत, पण क्रिकेट चाहत्यांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम:

पहिला टी-२० सामना : १ जुलै (डरहॅम)

दुसरा टी-२० सामना : ४ जुलै (मँचेस्टर)

तिसरा टी-२० सामना : ७ जुलै (नॉटिंघम)

चौथा टी-२० सामना : ९ जुलै (ब्रिस्टल)

पाचवा टी-२० सामना : ११ जुलै (साऊथॅम्प्टन)

पहिला वनडे : १४ जुलै (बर्मिंगहॅम)

दुसरा वनडे : १६ जुलै (कार्डिफ)

तीसरा वनडे: 19 जुलाई (लॉर्ड्स)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!