Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

सातारा: पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मंजूर केलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण तालुक्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकींना जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलेश गहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त कुटुंबांची संख्या ५४६ आहे. या सर्व कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरकुले मंजूर करण्यात आली आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. धावडे येथे ७९, काहीर ३७, आंबेघर ३०, गोकुळ तर्फ ८, चाफेर १०२ येथे काम सुरू आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. देशमुखवाडी येथील १९२ घरकुलांचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू करावे.

त्याबरोबरच मोडकवाडी येथील ८८ घरकुलांच्या जागेसाठी पाहणी तातडीने करावी, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले. पापर्डे व येराड येथील जल पर्यटन केंद्राचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, कामांची निविदा तात्काळ काढावी या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमध्ये काही अडचणी असतील तर त्या तातडीने दूर कराव्यात.

कराड चिपळूण मार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, म्हावशी फाटा ते संगम धक्का मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मिशन मोडवर काम करावे. कुठे अतिक्रमणे असतील तर ती तातडीने काढावी, अशा सूचना करून वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!