Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा; मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा; मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी

नंदुबार: पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी केली. याबाबतचे मागणी पत्रही केंद्रीय मंत्री पाटील यांना दिले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

प्रकाशा-बुराई योजना ही नंदुरबार तालुक्यासह साक्री व शिंदखेडा तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही योजना पूर्ण झाल्यावर सुमारे 7,085 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. राज्य शासनाने योजनेला 793 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, काम संथ गतीने सुरू आहे. केंद्र सरकारच्या सहाय्य पात्र योजनेत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास कामाला गती मिळेल आणि या भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटेल. तसेच यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. रोजगाराच्या संधी ही वाढतील,असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी बारमाही होऊन माथा ते पायथा नदी टप्प्यात येणारी सर्वच शेत जमीन सिंचनाखाली येईल. बागायती शेती झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे ही योजना केंद्र सरकारच्या साहाय्य पात्र योजनेमध्ये समाविष्ट करावी, अशी मागणी मंत्री रावल यांनी यावेळी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!