नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. काही फोन्सच्या किमती जास्त तर काही फोन अगदी बजेटमध्ये आहेत. टेक मार्केटमध्येही अनेक स्मार्ट डिव्हाईसेस उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने आपला नवा स्मार्टफोन Honor X7c 5G भारतात लाँच केला आहे.
Honor हा चिनी ब्रँड जरी असला तरी या फोनमध्ये बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन भारतात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. हा फोन या आठवड्याच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हा फोन सध्या फक्त ऑनलाईन आहे. मार्केटमधून तुम्हाला हा फोन घेता येणार नाही. तुम्ही हा स्मार्टफोन केवळ Amazon वरून खरेदी करू शकता. कंपनी हा फोन खास किमतीत देत आहे.
Honor X7c 5G या फोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 5200mAh बॅटरी आणि 35W चार्जिंग देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर असणार आहे. कंपनीने अद्याप Honor X7c 5G ची मूळ किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, या ब्रँडने त्याची खास किंमत जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन बुधवारी 14999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला. ही या फोनची सुरुवातीची किंमत आहे, ज्या किमतीत तुम्हाला 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल.
अनेक बेस्ट फीचर्सचा समावेश
Honor X7c 5G ड्युअल सिम सपोर्टसह येतो. त्याला Android 14 वर आधारित MagicOS 8.0 मिळते. स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा TFT LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 850Nits पीक ब्राइटनेससह येतो. फोन स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसरवर काम करतो.


