नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 15T लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन 50MP कॅमेरे, 7000mAh बॅटरीसह अनेक बेस्ट असे फीचर्स असणार आहेत.
Realme 15T च्या या स्मार्टफोनमध्ये 4000 Nits पीक ब्राइटनेस आहे. हा Realme 15 सीरीजमधील बेस्ट असा स्मार्टफोन असणार आहे. Realme 15T भारतात 20999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे, जो 8GB + 1286GB स्टोरेजमध्ये मिळत आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट मिळेल. या स्मार्टफोनसाठी पहिला सेल 6 सप्टेंबर रोजी होईल.
Realme 15T च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 22999 रुपये आहे. तर, 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये आहे. यावर दोन हजार रुपयांची बँक ऑफर उपलब्ध आहे, ज्यासाठी निवडक बँकेचे कार्ड वापरावे लागेल.
Realme 15T चे स्पेसिफिकेशन
Realme 15T मध्ये ६.५७ इंचाचा डिस्प्ले आहे, जो FHD+ आहे. त्याची पीक ब्राइटनेस ४००० निट्स आहे. या Realme हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
Realme 15T चा प्रोसेसर
Realme 15T मध्ये MediaTek Dimensity 6400 Max 5G चिपसेट वापरण्यात आला आहे. यात ८GB आणि १२GB LPDDR4X रॅमचे पर्याय आहेत. याशिवाय, १२८GB आणि २५६GB स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही त्यात २TB मायक्रोएसडी कार्ड ठेवू शकता.


