Mumbai Local Train Fight: मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठाणे-वाशी लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेला वाद शाब्दिक भांडणापासून थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सीटवरून वाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एका प्रवाशाने मोबाईलवर या घटनेचे चित्रीकरण केले, ज्यामध्ये गुलाबी टी-शर्ट घातलेला व्यक्ती आणि दुसरा प्रवासी एकमेकांना जोरदार मारहाण करताना दिसत आहेत.
पहा व्हिडिओ –
ठाणे-वाशी ट्रांस हार्बर लोकल में सीट को लेकर दो यात्रियों के बीच कहासुनी मारपीट तक पहुँची।
सुबह 11 बजे हुई इस घटना में सह-यात्रियों ने बीचबचाव कर दोनों को शांत कराया।#lifeline #Mumbailifeline #Mumbailocaltrain #transharbour pic.twitter.com/g8eUjtakYG— Visshal Singh (@VishooSingh) September 10, 2025
यावेळी ट्रेनमधील इतर प्रवाशांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना शांत केले. तथापि, मध्य रेल्वेकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मुंबई लोकलमध्ये गर्दीमुळे अशा घटना वारंवार घडताना दिसतात. सीट, चढताना किंवा उतरताना होणारे वाद नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.


