Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजा गायकवाडचा ‘पिंजरा’ उघड; साक्षीदार म्हणूनच बर्गे कसा अडकला?

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजा गायकवाडचा ‘पिंजरा’ उघड; साक्षीदार म्हणूनच बर्गे कसा अडकला?

सोलापूर/बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ९ सप्टेंबर २०२५ रोजी वैरागजवळील सासुरे गावात पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून बर्गे यांनी आत्महत्या केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लावणी नर्तकी पूजा देविदास गायकवाड (वय २१) हिच्या नावावर बार्शीतील वैराग येथे पावणे दोन गुंठे जमीन खरेदी करण्यात आल्याचा मोठा पुरावा समोर आला आहे. या जमिनीची किंमत सुमारे ५ ते ७ लाख रुपये आहे, आणि विशेष म्हणजे, या व्यवहारात गोविंद बर्गे स्वतः साक्षीदार म्हणून सही करणारे होते! हे खुलासे वैराग पोलिसांच्या तपासातून आणि टीव्ही९ मराठीसारख्या माध्यमांनी मिळवलेल्या दस्तऐवजांमधून समोर आले आहेत, ज्यामुळे पूजाच्या ब्लॅकमेलिंग आणि मालमत्ता लुबाडण्याच्या आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.

गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच होते. ते विवाहित आणि व्यवसायात सक्रिय होते, विशेषतः प्लॉटिंग व्यवसायातून चांगली कमाई करत होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पारगाव कला केंद्रात लावणी नर्तकी म्हणून काम करणाऱ्या पूजा गायकवाडशी त्यांची ओळख झाली. या दोघांमधील संबंध दीड वर्षांपासून सुरू होते, ज्यात गोविंद यांनी पूजाला सोन्याचे दागिने, मोबाईल फोन (एकूण सुमारे २.५ लाख रुपये किंमत) आणि इतर महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या.

कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, पूजा यांनी गोविंद यांच्यावर सतत तगादा लावला. गेवराई येथील त्यांचा बंगला नावावर करण्यासाठी धमक्या दिल्या, दुष्कर्माचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. शेवटच्या काही दिवसांत दोघांमधील भांडणे वाढली होती. ८ सप्टेंबरला गोविंद यांनी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला. यामुळे निराश झालेल्या गोविंद यांनी ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री पूजाच्या सासुरे गावातील घरी जाऊन, तिच्या घरासमोरच कारमध्ये स्वतःवर गोळी झाडली. कारमधून पिस्तूलही सापडले.

गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यात पूजावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (IPC कलम ३०६) आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप आहे. पोलिसांनी तिला अटक केली आणि बार्शी न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कोठडी १३ सप्टेंबर २०२५ रोजी संपणार आहे, ज्यानंतर पुढील तपास होईल.

साक्षीदार म्हणून बर्गे कसा गुंतला?

वैराग पोलिसांच्या तपासात आणि माध्यमांनी मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार, पूजा गायकवाडच्या नावावर वैराग येथे पावणे दोन गुंठे (काही अहवालांनुसार दीड गुंठे) जमीन खरेदी करण्यात आली. ही खरेदी ७ लाख रुपयांत झाली असून, दस्तऐवजात गोविंद बर्गे स्वतः साक्षीदार म्हणून सही करणारे दिसतात. याशिवाय, पूजाचा भाऊ प्रशांत गायकवाडही साक्षीदार आहे. बर्गे कुटुंबीयांचा दावा आहे की, गोविंद यांनी ही जमीन पूजासाठी खरेदी केली आणि नावावर केले, ज्यामुळे त्यांचा ‘पिंजरा’ उघड झाला. हे पुरावे पूजाच्या मालमत्ता लुबाडण्याच्या आरोपांना पुष्टी देतात.

पूजा यांची जीवनशैलीही संशयास्पद आहे. महागड्या साड्या, चारचाकी गाडीचा शौक आणि कला केंद्रातील काम. तिच्या इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये ती म्हणते, “मला तुझ्याशी ब्रेकअप करायचं, माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत,” ज्याचा संबंध गोविंद यांच्या आत्महत्येशी जोडला जात आहे. शेवटच्या रात्री पूजा व्हिडिओ शूट करत होती, तर गोविंद निराश होऊन कारमध्ये बसले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!