नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टने वर्षातील सर्वात मोठा सेल सुरू केला आहे. या सेलला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल म्हटले जात आहे. या सेलदरम्यान, स्मार्टफोन, आयफोन, अॅक्सेसरीज, चार्जर, पॉवर बँक, TWS, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि कपड्यांवर अनेक उत्तम डील, ऑफर्स आणि सूट उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्ट सेल दरम्यान १०% पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक उपलब्ध असणार आहे, ज्यासाठी अॅक्सिस बँक आणि ICICI बँक कार्ड वापरणे आवश्यक आहे. हा कॅशबॅक सर्व श्रेणीतील वस्तूंवर उपलब्ध असेल. जर तुम्हाला iPhone १६ घ्यायचा असेल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट असा ठरणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन ५१९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये सर्व ऑफर्स समाविष्ट असणार आहेत.
तसेच या ऑफरअंतर्गत, सॅमसंग गॅलेक्सी एस२४ फ्लिपकार्ट सेल बॅनरवर ३९९९९ मध्ये लिस्टेट आहे. हा हँडसेट गेल्या वर्षी ७४९९९ मध्ये लाँच करण्यात आला होता. आता, जवळजवळ अर्ध्या किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध असणार आहे.


