पुणे : आर्मी पब्लिक स्कूल देवलाली, नाशिक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. 6 ऑक्टोबर, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आर्मी पब्लिक स्कूल देवलाली येथे प्रशासकीय पर्यवेक्षक, उच्च श्रेणी लिपिक, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशासकीय पर्यवेक्षक, उच्च श्रेणी लिपिक, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल.
– नोकरीचे ठिकाण : देवळाली, नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोस्टने / वैयक्तिकरित्या/ प्रत्यक्ष सादर).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोबर २०२५ दुपारी २:०० वाजेपर्यंत.
– अर्ज पाठवण्याचा करण्याचा पत्ता : प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल देवलाली, हॅम्पडॉन लाईन्स देवलाली, नाशिक, महाराष्ट्र – ४२२४०१.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.apsdevlali.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


