Today सोमवार, 5th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यावर पुन्हा पावसाचे संकट.! 27 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

राज्यावर पुन्हा पावसाचे संकट.! 27 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुणे : महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले असून, अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, आता हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असली, तरी आठवड्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने 26 सप्टेंबरपासून कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील दक्षिण व पूर्व भागांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. 27 सप्टेंबरला कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर 28 सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव कायम राहील. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ओला दुष्काळ म्हणजे काय?

ज्या भागात 20 तासांत 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान होते, तिथे अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. गावच्या पीक आणेवारी समितीच्या अहवालानुसार, जर पीक आणेवारी 50% पेक्षा कमी असेल आणि गावाच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झाला असेल, तर ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!