नवी दिल्ली : सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर आणण्यात आले आहे. मेटाच्या मालकीच्या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर आता युजर्ससाठी संवाद साधणे आणखी सोपे झाले आहे. ते आता कोणत्याही भाषेतील मेसेज स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकतात.
पूर्वी, वेगळ्या भाषेतील मेसेज समजून घेण्यासाठी लोकांना गुगल ट्रान्सलेटवर जावे लागत असे. आता तसे होणार नाही. ते अॅपमध्येच मेसेज भाषांतरित करू शकतील. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप ब्लॉग पोस्टनुसार, व्हॉट्सअॅपचे ट्रान्सलेट फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी सहा भाषांमध्ये काम करेल. याचा अर्थ अँड्रॉइड वापरकर्ते इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, पोर्तुगीज, रशियन आणि अरबी या सहा भाषांमध्ये मेसेज भाषांतरित करू शकतील.
WhatsApp चे फीचर 1:1 चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल अपडेट्ससाठी काम करणार आहे. Android युजर्स संपूर्ण चॅट थ्रेडसाठी स्वयंचलित भाषांतर चालू करू शकतात. हे संभाषणातील सर्व संदेश स्वयंचलितपणे भाषांतरित करेल. हे वैशिष्ट्य सध्या Android आणि iOS डिव्हाइसेसवर रोल आउट होत आहे.


