Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात! होर्डिंग लावताना 10 कामगार 7 व्या मजल्यावरून पडले; 2 जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात! होर्डिंग लावताना 10 कामगार 7 व्या मजल्यावरून पडले; 2 जणांचा मृत्यू

Ahmedabad Hoarding Tragedy : गुजरातच्या अहमदाबाद शहरात रविवारी एक भीषण अपघात घडला. दक्षिण बोपल परिसरातील विश्वकुंज-2 अपार्टमेंटमध्ये जाहिरात होर्डिंग लावताना 10 कामगारांचा तोल जाऊन ते सातव्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. उर्वरित सात कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, पार्श्व जाहिरात एजन्सीने व्हीएस ज्वेलर्ससाठी होर्डिंग लावण्याचे काम कंत्राट घेतले होते. कंत्राटदार उमेश आणि विकास यांच्या देखरेखीखाली सुमारे 15 कामगार काम करत होते. काम सुरू असताना 10 कामगारांसह संपूर्ण होर्डिंगचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. होर्डिंग एका विजेच्या खांबावर आदळले आणि त्यामुळे खाली उभ्या असलेल्या एका कारचे नुकसान झाले.

दरम्यान, अहमदाबाद ग्रामीण पोलिस उपअधीक्षक नीलम गोस्वामी यांनी सांगितले की, मृतांची ओळख राज आणि महेश अशी पटली असून दोघेही उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. एक गंभीर जखमी कामगार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

परवानगीशिवाय काम

प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. होर्डिंग सोसायटीच्या भाडे कराराचा भाग होता, परंतु अहमदाबाद महानगरपालिका (एएमसी) कडून परवानगी न घेता हे काम सुरू करण्यात आले होते. या घटनेमुळे बांधकाम आणि होर्डिंग कामांदरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दुर्घटनेनंतर सोसायटी व जाहिरात एजन्सीच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!