Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आशिया कप विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचे ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य; पंतप्रधान मोदींचाही केला उल्लेख

आशिया कप विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचे ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य; पंतप्रधान मोदींचाही केला उल्लेख

Suryakumar Yadav On Asia Cup Victory: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत आशिया कपची ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि प्रत्येकवेळी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, विजयानंतर ट्रॉफी स्वीकारण्यावरून मैदानावर अनोखे नाट्य रंगले.

ट्रॉफी स्वीकारण्यावरून वाद

दरम्यान, 28 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पीसीबी प्रमुख व एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायची नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. नक्वी मात्र आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, संघाने मैदानावर ट्रॉफीशिवायच जल्लोष साजरा केला.

सूर्यकुमार यादव काय म्हणाले?

या प्रकरणाबाबत विचारले असता सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे लोकांची मने जिंकणे आहे. ट्रॉफीचे फोटो इकडे-तिकडे फिरत आहेत, पण संघाने केलेल्या मेहनतीत आणि चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमातच खरी ट्रॉफी आहे. विजयानंतर संघातील आनंदाबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, जेव्हा तुम्ही एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकता, तेव्हा तो अनुभव खास असतो. संपूर्ण देशासाठी ही अविस्मरणीय भावना आहे.

पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया

भारताच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून अभिनंदन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सूर्या म्हणाला, देशाचे नेते स्वतः फ्रंटफूटवरून फलंदाजी करतात तेव्हा खूप छान वाटते. असे वाटले की त्यांनी स्ट्राईक घेतला आणि धावा काढल्या. खेळाडूंना यामुळे अधिक आत्मविश्वास मिळतो. भारताच्या या विजयानंतर चाहत्यांसाठी मैदानावरील जल्लोषच खरी ट्रॉफी ठरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!