Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar: पिकांचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; वेळेत उपचार मिळाल्याने वाचले प्राण

Ahilyanagar: पिकांचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; वेळेत उपचार मिळाल्याने वाचले प्राण

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून पंचनाम्याची मोहीम सुरू असताना गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. धनेगावचे तलाठी आकाश रामभाऊ काशिकेदार हे शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी गेले असता त्यांना सर्पदंश झाला.

प्राप्त माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशीसुद्धा कर्तव्यावर असलेले काशिकेदार सकाळी 8 वाजल्यापासून शेतात फिरत होते. शेतकरी सुहास काळे, संदीप काळे आणि प्रमोद काळे यांच्या शेताकडे जात असताना, गवतात लपलेल्या सापावर पाय पडल्याने त्यांना सर्पदंश झाला. तात्काळ भोवळ येऊ लागल्याने सोबतचे शेतकरी धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना जवळच्या वस्तीवर आणले. नदीमुळे गाडी थेट पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांना बंधाऱ्यावरून उचलून आणले आणि शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल केले.

हेही वाचा – Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार

यावेळी सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वेळेवर उपचार मिळाल्याने सुदैवाने तलाठी काशिकेदार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

हेही वाचा – Eknath Shinde : पूरग्रस्तांच्या मुला-मुलींसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; लग्नाची जबाबदारी शिवसेना उचलणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे तब्बल 3 लाख 40 हजार 293 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या आपत्तीचा फटका 1034 गावांतील 4 लाख 85 हजार 166 शेतकऱ्यांना बसला असून पंचनाम्यानंतर आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!