Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati News: 6 तास पाण्यावर तरंगत होता मृतदेह; अखेर स्थानिक तरुणांनी काढला बाहेर, बारामतीतील डोर्लेवाडीमधील घटना

Baramati News: 6 तास पाण्यावर तरंगत होता मृतदेह; अखेर स्थानिक तरुणांनी काढला बाहेर, बारामतीतील डोर्लेवाडीमधील घटना

Baramati News: कऱ्हा नदी पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आहे. गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थ नदीकाठी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी काही नागरिकांना कऱ्हा नदी पात्रात एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. यावेळी ग्रामस्थांनी गावाचे पोलीस पाटील नवनाथ मदने यांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटीलांनी सदरची माहिती बारामती शहर पोलिसांना कळवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दिसून आलेला मृतदेह तब्बल सहा तास उलटल्यानंतर ही त्याच जागेवर बेवारसपणे पडून होता. पोलीस शिपाई नेवसे यांनी डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत डोर्लेवाडी, बारामती नगरपालिका, या सर्वांना मदतीसाठी फोन केले. मात्र, वेगवेगळे कारण सांगून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या भोंगळ कारभारामुळे गावातील तरुणांनी शेवटी एकत्र येत पाण्यामध्ये उतरून तो मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह हा सडलेला असल्याने त्याच्या दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. तरीही तरुणांनी ते प्रेत बाहेर काढून पोलीस शिपाई यांच्या ताब्यात देत पुढील कारवाही साठी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!