Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gautami Patil Car Accident: ‘एवढा मोठा अपघात झाला पण कोणतीच चौकशी केली नाही’; गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Gautami Patil Car Accident: ‘एवढा मोठा अपघात झाला पण कोणतीच चौकशी केली नाही’; गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Gautami Patil Car Accident: पुण्यातली वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला मागून धडक दिली. ज्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व घटनांदरम्यान, जखमी रिक्षा चालक मरगळे याच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केलाय की,एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला. त्याशिवाय, पोलिसही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याच मरगळे कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालकासह या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर समोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

पोलीस सहकार्य करत नसल्याचा कुटुंबाचा आरोप
गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला.

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला. पण अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील नव्हती अशी माहिती समोर आली आहे. एका हॉटेल समोर थांबलेल्या रिक्षाला कारने धडक दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!