Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार

Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार

Maharashtra Flood Aide: अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेतील (DPDC) निधीचा पाच टक्के भाग अतिवृष्टी, पूर, गारपीट आणि टंचाईग्रस्त परिस्थितीसाठी थेट वापरता येणार आहे. यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये निधी मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

नागरिकांना आर्थिक मदतीचा तातडीने लाभ मिळणार

या निर्णयामुळे मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर यासह अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागातील नागरिकांना आर्थिक मदतीचा तातडीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी ही मुभा केवळ टंचाईसाठीच होती. आता ती पूर, अतिवृष्टी आणि गारपीटसाठी देखील लागू होईल.

हेही वाचा – धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा, पूरामध्ये घरदार वाहून गेलं, पैसे भरायचे कुठून? शेतकऱ्यांचा संताप

सरकारच्या तरतुदीनुसार:

  • जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीच्या 5% पर्यंत खर्च करून तातडीच्या उपाययोजना राबवता येतील.
  • जर परिस्थिती गंभीर असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने 10% पर्यंत निधी वापरण्याची मुभा राहील.
  • एका आर्थिक वर्षात जर प्रथम टंचाई आणि नंतर अतिवृष्टी/पूर/गारपीट उद्भवली, तर टंचाईसाठी खर्च झालेल्या निधीतील उर्वरित भाग तातडीच्या उपाययोजनांसाठी वापरता येईल.
  • उपाययोजनांसाठी निधी मंजूर करण्याचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांकडे राहतील, पण नंतरच्या बैठकीत मान्यता घेणे आवश्यक आहे.

सरकारने अधिसूचना जारी करत सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना उपाययोजना त्वरीत राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागातील नागरिकांना लवकरात लवकर मदत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!