Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुणे हादरले! करडे घाटात फिल्मी स्टाईलने गाड्यांची धडक आणि गोळीबार; कुख्यात गुन्हेगाराचा जागीच गेम

Pune Crime: पुणे हादरले! करडे घाटात फिल्मी स्टाईलने गाड्यांची धडक आणि गोळीबार; कुख्यात गुन्हेगाराचा जागीच गेम

Pune Crime: पुणे पोलिसांकडून शहरात शांतता आणि सुव्यवस्था असल्याचा दावा केला जात असतानाच, शिरूर तालुक्यातून कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक थरारक घटना समोर आली आहे. तालुक्यातील करडे घाटात दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून रक्ताळलेला संघर्ष झाला. दोन्ही गटांनी फिल्मी स्टाईलने एकमेकांचा पाठलाग करत आधी गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यानंतर बेछुट गोळीबार केला. या टोळीयुद्धात विशाल काळे (वय २१) नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शिरूर परिसरात कमालीची दहशत पसरली असून वर्चस्वाच्या लढाईतून गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

चार गोळ्या झाडल्या, मग डोक्यात घातला दगड

या रक्ताळलेल्या थराराची पार्श्वभूमी एका जुन्या राजकीय हत्याकांडाशी जोडलेली आहे. शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल काळे आणि सनी यादव हे दोघेही अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास करडे घाटात हे दोन्ही गट आमनेसामने आले. सूडभावनेने पेटलेल्या सनी यादवच्या गटाने विशालच्या कारला जोरदार धडक दिली. गाडी थांबताच सनीने विशाल काळेवर एकापाठोपाठ एक चार राऊंड फायर केले. गोळ्या लागून विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही नराधमांचे मन भरले नाही, त्यांनी विशालच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि तिथून पोबारा केला.

पोलिसांची घटनास्थळी धाव; मुख्य आरोपी फरार

घाटात गोळीबार आणि हत्येचा हा थरार घडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या फौजफाट्यासह तात्काळ करडे घाटात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भरदिवसा घडलेल्या या गँगवारमुळे पोलिसांच्या सुरक्षेच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सनी यादव आणि त्याचे साथीदार सध्या फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!