Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तब्बल 200MP चा कॅमेरा असलेला Samsung च्या ‘या’ फोनची किंमत झाली कमी; 60000 रुपयांचा मोठा डिस्काउंट

तब्बल 200MP चा कॅमेरा असलेला Samsung च्या ‘या’ फोनची किंमत झाली कमी; 60000 रुपयांचा मोठा डिस्काउंट

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातच या सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना मोठा डिस्काउंट दिला जात आहे. अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. तुम्ही या सेलचा फायदा घेऊन अनेक फोन सवलतीत खरेदी करू शकता. असाच एक फोन सेलमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही Samsung Galaxy S24 Ultra 5G अनेक हजार रुपयांच्या सूटीत खरेदी करण्यासाठी सेलचा फायदा घेऊ शकता.

Samsung Galaxy S24 Ultra 5G कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन १३४९९९ रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. ही एमआरपी आहे आणि फोन १२९९९९ रुपयांना उपलब्ध होता. ही किंमत १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. आता हा फोन अमेझॉन सेलमध्ये ७४९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. हा फोन बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक दोन्हीसह उपलब्ध आहे. या ऑफर्सचा फायदा घेऊन ६०००० रुपयांची बचत करू शकतात. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही आणखी बचत करू शकता.

Samsung Galaxy S24 Ultra 5G मध्ये 6.8-इंचाचा डायनॅमिक LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला आर्मर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. हा हँडसेट Android 14 वर आधारित OneUI 8 वर चालतो.

तसेच, फोनला सात वर्षांचे Android अपडेट्स मिळतील. स्मार्टफोनमध्ये 200MP + 10MP + 50MP + 12MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने फ्रंटला 12MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 5000mAh ची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!