Vijay Devarakonda Car Accident: दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाचा नुकताच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोबत साखरपुडा झाला. या आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेत असतानाच विजय देवरकोंडाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, हा अपघात किरकोळ स्वरूपाचा होता आणि विजय देवरकोंडाला कोणतीही दुखापत झाली नाही. पुट्टपती येथून हैदराबादला जाताना त्याच्या कारला अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो रविवारी आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत पुट्टपती येथे गेला होता. सोमवारी तो हैदराबादला परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. ही घटना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवली परिसरात घडली. विजयच्या कारला एक बोलरो गाडीने धडक दिली.
या अपघातात विजयच्या कारचे काहीसे नुकसान झाले. त्याच्या कारच्या पुढच्या बाजूला धडक बसल्याने ती बाजू चेपली असल्याचं दिसून येतंय. मात्र, कारमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही दुखापत झाली नाही. कारचा अपघात झाल्यामुळे विजय देवरकोंडाला पुढचा प्रवास त्याच्या मित्राच्या गाडीतून करावा लागला. अपघाताच्या वेळी रस्त्यावर वर्दळ होती, पण कोणतीही गंभीर जखम किंवा जीवितहानी झाली नाही..


