Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Harshwardhan Sapkal: पुण्यातील गुन्हेगारीमागे भाजप अन् अजित पवारांची राष्ट्रवादी- हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: पुण्यातील गुन्हेगारीमागे भाजप अन् अजित पवारांची राष्ट्रवादी- हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal: पुण्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला बळ देणारा ‘दादा’ कोण?, असा सवाल त्यांनी केलाय. ते अकोला येथे बोलत होते. काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते अकोल्यात आले होते. गुंड निलेश घायवळला चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) मदत असल्याच्या शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर ते बोलत होते. पुण्यातील गुन्हेगारीच्या पाठीशी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असल्याच्या आमच्या आरोपाला धंगेकरांच्या आरोपामुळे पुष्टी मिळाल्याचं ते म्हणालेय.

दरम्यान, एकनाथ शिंदेंचं मोठेपण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. यानंतरचा टप्पा हा लाडकी बहीण योजना बंद करण्याचा राहणार असल्याचा ते म्हणाले. दरम्यान, बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होणार. तर काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते आपल्या सोबत असल्याचाही त्यांनी आवर्जून सांगितलंय.

बिहारच्या निवडणुकीत मोठे जनआंदोलन उभे राहील. बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होईल. राहुल गांधींच्या बिहारमधील जनता यात्रेला अलोट प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गांधींनी दिलेला ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा नारा बिहारच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करेल. असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग्ज विकणाऱ्याला कोणी मदत केली? हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यामधील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गॅंगच्या पाठीमागे कोणता ‘दादा’ आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं. पुण्यातील गुन्हेगारीला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे, या आमच्या आरोपावर धंगेकरांच्या आरोपांमुळे शिक्कामोर्तब होत आहे.

आमच्या पक्षाचे युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा ही स्थानिक आणि ब्लॉक पातळीवर होईल.

लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय त्याचाच एक भाग आहे. आनंदाचा शिधा बंद करण्यामागे एकनाथ शिंदेंचे नाव होऊ नये, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!