मुंबई : महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS officers Transfers) केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon) आणि पुणे (Pune) जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कोलटे यांची पुणे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ही बदली यादी (transfer list) मंगळवारी जारी केली आहे.
IAS बदल्यांची यादी, कोणाची नियुक्ती कुठे?
1. देवेंद्र सिंह : MPCB चे नवे सदस्य सचिव
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी असलेले देवेंद्र सिंह यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
2. शेखर सिंह : कुंभमेळा आयुक्त
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना नाशिक येथील कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती आगामी कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
3. जलज शर्मा : नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (NMRDA) आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
4. आयुष प्रसाद : नाशिकचे नवे जिल्हाधिकारी
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
5. रोहन घुघे : जळगावचे जिल्हाधिकारी
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुघे यांना जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
6. संजय कोलटे : साखर आयुक्त, पुणे
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलटे यांची पुणे येथील साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
7. मनोज जिंदल : रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत नवचैतन्य येण्याची शक्यता आहे. विशेषतः कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या आयोजनाच्या तयारीसाठी शेखर सिंह यांची नियुक्ती आणि साखर उद्योगाच्या व्यवस्थापनासाठी संजय कोलटे यांची नियुक्ती याकडे विशेष लक्ष लागले आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण आणि जिल्हा प्रशासनातील बदलांमुळे संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.


