नवी दिल्ली : सध्या अनेकजण रिल्स बनवताना दिसत आहेत. त्यात इन्स्टाग्राम रील्स मनोरंजनाचा एक प्रमुख स्रोत बनले आहे. जर तुम्हाला कोणत्याही क्रिएटर्सचे रील्स तुमच्या स्वतःच्या भाषेत पाहता आले तर? मेटाने एआय-संचालित रील्स भाषांतरचे फीचर आणले आहे. ते आता हिंदी आणि पोर्तुगीज भाषांना सपोर्ट करत आहे. पूर्वी ते फक्त इंग्रजी आणि स्पॅनिशला सपोर्ट करत होते.
या अपडेटसह, रिल्स अधिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. क्रिएटर्स त्यांचा कंटेंट ग्लोबली व्ह्युअर्ससाठी तयार करू शकतील. हे फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर उपलब्ध असणार आहे. ते क्रिएटर्सना त्यांचा कंटेंट अनेक भाषांमध्ये सामायिक करण्यास परवानगी देऊ शकतो. हे फीचर क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचे स्रोत देखील बनू शकेल. जागतिक बाजारपेठेत क्रिएटर्सच्या प्रवेशासह, ते ब्रँडसह प्रचारात्मक सामग्रीसाठी अधिक कमाई देखील करतील. याचा परिणाम येत्या काळातच कळेल. अनेक क्रिएटर्सची ग्लोबली प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी हे अपडेट महत्त्वाचे ठरू शकणार आहे.
मेटा एआयच्या नवीन फिचर्ससह, क्रिएटर्स रील्सचे भाषांतर करू शकतील. प्रेक्षकांना हा पर्याय देखील मिळेल, ज्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या भाषेत रील पाहू आणि समजून घेऊ शकतील. सध्या, हे फीचर इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेत काम करते. मेटाने क्रिएटर्स आणि प्रेक्षक दोघांसाठी कंट्रोल्स जारी केली आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांचे भाषांतर करण्याचा पर्याय मिळू शकणार आहे.


