Gold Rate Perdiction : सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत असून, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर सतत वाढत असताना, दिवाळीत त्यात किंचित घसरण दिसली. मात्र, आता पुन्हा दरवाढीचा ट्रेंड सुरू झाला आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२५ अखेरीस आणि २०२६ मध्येही सोन्याचे दर उच्चांक गाठणार आहेत. जागतिक बाजारपेठेत येणारी मंदी सोन्याच्या किंमतींना नवी उंची देईल, असा अंदाज आहे.
बाबा वेंगा यांच्या मते, २०२६ मध्ये सोन्याचे दर १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त होतील. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोन्याच्या किंमती २५ ते ४० टक्क्यांनी वाढून प्रति तोळा १,६२,५०० ते १,८२,००० रुपये होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर लवकरच सोन्याचे दर २ लाखांचा टप्पा पार करतील, अशी शक्यता आहे. यामुळे सोने खरेदी करणे आणखी कठीण होणार आहे. बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असून, त्यांच्या या भाकितामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोन्याच्या किमतीवर वाढला दबाव
सोन्याच्या किमती जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या ताकदीवर अवलंबून असतात. मात्र, या वर्षी एकंदर अनिश्चिततेचं वातावरण होतं, त्यामुळे किंमत अजून वाढली. पण आता अनिश्चितता झाल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. सेंट्रल बँकेतेर्फे सातत्याने सोनं खरेदी केलं जात आहे. पण गुंतवणूकदार देखील सतर्क आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, ते विकण्याचा गुंतवणूकदारांचा विचार आहे.


