Today रविवार, 22nd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भारतात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरची छेडछाड; आरोपी अकील खान 6 तासांत पोलिसांच्या ताब्यात

भारतात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरची छेडछाड; आरोपी अकील खान 6 तासांत पोलिसांच्या ताब्यात

Australian female cricketers sexually assaulted Aqueel Khan arrested: सध्या भारतात आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. इंदोरमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील दोन महिला खेळाडूंसोबत तेथे एक घाणेरडी घटना घडली. हॉटेल रेडिसन ब्लू येथून कॅफेकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगल्याच घाबरल्या. त्यांनी त्वरीत संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्या तक्रारीवरून अकील खान या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

इंदोरच्या खजराणा रोडवरील प्रकार

गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खजराणा रोडवर ही घटना घडली होती. दोन्ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू कॅफे द नेबरहूडकडे जात होत्या. तेव्हा पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे लागला. तो वेगाने त्यांच्या जवळ आला आणि एका महिला क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि इंदोर पोलिसांनी अकील खानला ताब्यात घेतले.

दरम्यान, जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हा खेळाडू अस्वस्थ असल्याचे पाहून जवळच असलेल्या कारमधील एक माणूस मदतीसाठी पुढे आला होता आणि त्याने त्यांना धीर दिला होता. त्या व्यक्तीने नंतर दोन्ही खेळाडूंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लगेच पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. परदेशी खेळाडूंशी संबंधित या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. परदेशी नागरिकांशी छेडछाडीची घटना झाल्याने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाताळण्यात आले आणि सहा तासांच्या आत अकील खानला ताब्यात घेण्यात आले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!