पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, फेडरल बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
फेडरल बँक येथे अधिकारी (विक्री आणि ग्राहक संपादन) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अधिकारी (विक्री आणि ग्राहक संपादन)
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
– वयोमर्यादा : २७ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.federalbank.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


