Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss 19: प्रणित मोरेचा बसीर अलीला धोबीपछाड; डबल एलिमिनेशनंतर दोघांमधलं जुनं भांडण व्हायरल

Bigg Boss 19: प्रणित मोरेचा बसीर अलीला धोबीपछाड; डबल एलिमिनेशनंतर दोघांमधलं जुनं भांडण व्हायरल

Bigg Boss 19: नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ स्पेशल एपिसोडमध्ये सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. कल्पना नसलेलं डबल एव्हिक्शन झाल. त्याआधी एकदाच सुवातीला असं घडलं होतं. त्यानंतर आता डबल एव्हिक्शन झालं. गेल्या आठवड्यात कोणताच स्पर्धक BB19 च्या घरातून बाहेर नव्हता गेला. मात्र नवव्या आठवड्यात 2 स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता ५ आवड्यांचा खेळ राहीला आहे. बसीर अली आणि नेहल चुडासमा या दोघांचे एलिमिनेशन झाले आहे. बसीर आणि नेहलसह गौरव खन्ना आणि प्रणित मोरे हे दोघेही घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. मात्र प्रेक्षकांच्या वोट्समुळे गौरव-प्रणिताचले आणि बसीर-नेहलचा पत्ता कट झाला. यानंतर ‘गंदे डायनासॉर’च्या टास्कदरम्यानच बसीर आणि प्रणितमधील एका संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांनीही एकमेकांना आधी घराबाहेर कोण जाणार असं आव्हान दिल होतं.्यात प्रणितने बसीरला धोबीपछाड केल्याच समोर आलं आहे.

डायनासॉरच्या टास्कपूर्वी बसीरने प्रणितला ‘जिथून आला त्या गावी निघून जा’ असे डिवचले होते. शिवाय बसीरचा मित्र असणाऱ्या अमाल मलिकने प्रणितलाझाझू‘ या कार्टूनची उपमा दिली होती. यावरुन सोशल मीडियावर दोघांवरही जोरदार टीका झाली होती. सलमाननेही त्यांची शाळा घेतली होती. त्यानंतर डायनासॉर टास्कमध्ये बोलण्याची संधी मिळाल्यानंतर प्रणितने बसीर आणि त्याच्या टीमला रोस्ट केले होते. मात्र, आता प्रणित आणि बसीरचा एकमेकांना आव्हान देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रणितने बसीरला काय आव्हान दिलेलं?

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood yaar (@bollywoodyaar.in)

बसीरला रोस्ट करताना प्रणित म्हणाला होता की, ‘बसीर मला म्हणालेला की, तू तुझ्या गावी निघून जा. पण त्याला माहीत नाही की, हा महाराष्ट्र आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रच माझे गाव आहे. त्यामुळे तू इथून जा, चड्डीत राहा आणि चल निघ.’ बसीरच्या बाजूने बोलणाऱ्या फरहाना भट, झीशान कादरी यांना सुनावताना त्याने म्हटले होते की, ‘तुम्हा सगळ्यांसाठी मी एकटा पुरेसा आहे, एकटा आलोय आणि एकटाच तुम्हा सगळ्यांना घेऊन जाईन, मोडेन पण वाकणार नाही.’

बसीर-प्रणितमध्ये झालेल्या वादादरम्यान बसीर प्रणितला असे आव्हान देतो की, तो त्याला या खेळातून बाहेर काढून दाखवेल. त्यावर प्रणितने त्याला असे प्रत्युत्तर दिलेले, ‘मी इथेच आहे आणि तूही इथेच आहेस, बघूया कोण बाहेर जातंय. या शोमध्ये मी तुझ्यापेक्षा जास्त राहून दाखवेन.’ या टास्कदरम्यान दोघे ठरवतात की, त्यांच्यापैकी जो पहिल्यांदा घराबाहेर जाईल, त्याला दुसरा जे काही सांगेल ते करावं लागेल.

बसीर घराबाहेर गेल्याने तो दिलेलं वचन पूर्ण करेल का, हे प्रणित घराबाहेर आल्यावरच स्पष्ट होईल. मात्र प्रणितचे चाहते हा जुना प्रसंग आणि आताचा बसीरच्या एव्हिक्शनचा प्रसंग एकत्र एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!