Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुणे हादरलं! आईच्या प्रेमसंबंधांतून मुलाचा संताप अनावर; मध्यरात्रीचं काढला प्रियकराचा काटा, आंबेगाव परिसरात खळबळ

Pune Crime: पुणे हादरलं! आईच्या प्रेमसंबंधांतून मुलाचा संताप अनावर; मध्यरात्रीचं काढला प्रियकराचा काटा, आंबेगाव परिसरात खळबळ

Pune Crime: प्रेमसंबंधांचा रागातून पुण्यात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नगरमध्ये रविवारी रात्री हा रक्ताचा थरार घडला. स्वतःच्या आईचे एका परपुरुषासोबत असलेले संबंध मुलाला खटकत होते, त्यातूनच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय?
दीपक क्षीरसागर (वय 37) असे या घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक यांचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला महिलेच्या मुलाचा आणि तिच्या कुटुंबाचा कडाडून विरोध होता. या मुद्द्यावरून त्यांच्यात आधीही अनेकदा खटके उडाले होते. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. संतापाच्या भरात मुलाने दीपक यांच्यावर खुनी हल्ला चढवला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघांना पोलीस कोठडी
हत्त्येची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवले. याप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोन संशयितांना तातडीने ताब्यात घेतले आहे. या दोघांनी हत्येसाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

परिसरात दहशतीचे वातावरण
या भीषण हत्याकांडाने टेल्को कॉलनी आणि इंद्रायणी नगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला आहे. अनैतिक संबंधांतून उद्भवलेला हा वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!