Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, ६.४० लाख कोटींची कमाई

शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, ६.४० लाख कोटींची कमाई

मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आठवड्याचा शेवट दमदारपणे केला. शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ९१८ अंकांनी, म्हणजेच १.२० टक्क्यांनी वाढून ७७५५० वर बंद झाला, तर निफ्टी २७५ अंकांनी, म्हणजेच १.१६ टक्क्यांनी वाढून २४०५० च्या वर बंद झाला. निफ्टी बँक १०९१ अंकांनी वधारला.

बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी २५ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर उर्वरित पाचमध्ये घसरण झाली. सन फार्माचे शेअर्स जवळपास ४ टक्क्यांनी घसरले, तर आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले. या वाढीमुळे, बीएसईचे मार्केट कॅप ४४४.७९ लाख कोटींवरून ४५१.२० लाख कोटींवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ६.४० लाख कोटी कमावले. बीएसईवर व्यवहार झालेल्या ४४४९ शेअर्सपैकी, ३३६२ शेअर्समध्ये वाढ झाली होती. ९४४ शेअर्समध्ये घसरण झाली होती आणि १४३ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

११० शेअर्स त्यांच्या ५२-आठवड्यांच्या उच्चांकाच्या वर व्यवहार करत होते, तर २० शेअर्स त्यांच्या ५२-आठवड्यांच्या नीचांकावर होते. ८५ शेअर्स लोअर सर्किटमध्ये आणि ३३४ शेअर्स अप्पर सर्किटमध्ये होते.

शेअर बाजारात तेजी का आहे?

वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत असून, त्यामुळे बाजाराला आधार मिळत आहे. वित्त क्षेत्र आज १.६% ने वाढले असून या आठवड्यात त्यात ८.२% ची वाढ झाली आहे. निफ्टी पीएसयू बँक आणि खाजगी क्षेत्रातील बँक निर्देशांक १.८०% ने वाढले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!