Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मशरूम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मशरूम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पुणे: मशरूम म्हणजे वनस्पतीवर वाढणारी नैसर्गिक खाण्यायोग्य बुरशीच असते. वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचे काही गुणधर्म मशरूम्समध्ये असतात. वनस्पतीत न आढळणारं ‘ड’ जीवनसत्त्व त्यात असतं. मशरूम्स लो कॅलरी, लो सोडियम आणि फॅट फ्री असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहू शकतं, फळांप्रमाणे मशरूम्स ग्लुटेन फ्री असतात. त्यात अॅण्टीऑक्सिडंट्स तर आहेतच, याशिवाय सेलेनियम, कॉपर यासारखी खनिजं आणि पोटॅशियमही आहे. मशरूम्स हा ‘बी’ जीवनसत्त्वाचा एक चांगला स्रोत आहे. मशरूम पटकन शिजतात, सूप, पुलाव, भाज्या यात त्यांचा उपयोग केला जातो. फक्त मशरूम खर्ण योग्य आहेत की नाही हे बघून घ्यावे लागतं. कारण काही मशरूम्स विषारी असतात.

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूम असणारे प्रोटीन हे प्राथमिक दर्जाचे आहे, म्हणजे शरीरास जसे हवे तसे ते आहे. डाळ, बदाम यातही प्रोटीनचे प्रमाण अधिक असले तरी ते दुय्यम दर्जाचे आहे. मशरूमचा वापर ज्या देशात मोठ्या प्रमाणावर होतो, तेथे दरडोई वर्षाला ७० किलोपर्यंत त्याचा वापर होतो. भारतात हे प्रमाण केवळ अर्धा किलो इतके आहे. उच्चभ्रू लोकच याचा वापर करतात. उत्तरेप्रमाणेच तामिळनाडू, कर्नाटक या परिसरातही मशरूमचे उत्पादन घेतले जाते. लग्नसमारंभात या भाजीला मानाचे स्थान आहे. प्रोटीन शरीरात घेण्यासाठी मटन, मासे, दूध, सोयाबीन याचा वापर होतो मात्र शून्य कोलेस्टेरॉल असणारा एकमेव पदार्थ म्हणून मशरूमची ओळख आहे.

मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते, अशी सोयाबीन व गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला बगॅस (उसाचा रस काढून शिल्लक राहिलेला चोथा) याला सर्वाधिक महत्त्व आहे. २५ दिवसांत या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते. आपल्या देशात १९६८ साली आयसीएआर दिल्ली येथे हिमाचल प्रांतातील सोलन येथे मशरूमचे संशोधन करणारे केंद्र सुरू झाले. मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार याचे प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे औषधी व विविध लाभ आहेत

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!