महाराष्ट्र जागरण डेस्क : फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी आहे, याचा वापर फक्त भाजी बनवण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. याची भाजी जरी साधारण असली तरी यापासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या….
फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, काबर्बोहायड्रेट आणि लोहच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्याच प्रमाणात तांबा असतो. फुलकोबी आपल्याला एकाच वेळी बरीच पोषकद्रव्ये मिळवून देते.
रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ततेसाठी फुलकोबी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण याला कच्चं सॅलडच्या रूपात किंवा याचे ज्यूस बनवून देखील घेऊ शकता. या दोन्ही पद्धती उत्तमरीत्या कार्य करतील.
सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी आणि गाजराचा रस समप्रमाणात पिणं फायदेशीर असतं. सलग तीन महिने त्याचे सेवन केल्यानं फायदेशीर राहते.
कोलायटिस, पोटदुखी किंवा पोटाशी निगडित इतर समस्यांमध्ये फुलकोबी फायदेशीर असते. तांदळाच्या पाण्यात शिजवून याच्या हिरव्या भागाचे सेवन केल्यानं पोटाच्या त्रासापासून सुटका होते.
यकृतामध्ये असलेल्या एंझाइमला सक्रिय करण्यामध्ये कोबीचे सेवन फायदेशीर असते. याच्या सेवनामुळे लिव्हर योग्य प्रकारे कार्य करते आणि शरीरातून विषारी घटकांना काढून टाकते.
घशाचे त्रास जसे की, घशा दुखणं, सूज येणं असल्यावर फुलकोबीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून प्यायलानं घशाच्या समस्यांपासून फायदा मिळतो.
हिरड्यांमध्ये वेदना होणं किंवा हिरड्यांमधून रक्त येणं यासारखे त्रास असल्यास फुलकोबीच्या पानाच्या रसाने गुळण्या कराव्यात. हे फायदेशीर ठरेल. फुलकोबी पॅराथायराइड ग्रंथीच्या व्यवस्थित कार्याच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त आहे.
गरोदरपणात फुलकोबी फायदेशीर असते. ही व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असते आणि पेशींच्या वाढीसह गर्भात वाढणाऱ्या गर्भाला देखील फायदेशीर असते. फुलकोबी हे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहे.
वजन कमी करण्यात देखील हे फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी जास्तची चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामधील असलेले फॉलेट लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करते. यामध्ये स्टार्च नसतं.
हे अँटी ऑक्सिडेंट तसेच कॅल्शियमने समृद्ध आहेत, जे मज्जासंस्थेला बळकट करते. कॅल्शियम आपली हार्ड आणि दात बळकट बनवते आणि शरीराच्या योग्य अंमलबजावणीस मदत करतं.


