Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मे महिन्याचा मुहूर्त हुकला; आता ‘या’ तारखेला धावणार पहिली ट्रेन

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मे महिन्याचा मुहूर्त हुकला; आता ‘या’ तारखेला धावणार पहिली ट्रेन

Pune Metro: आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी पुणेकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मे महिन्यात सुरू होणारी ही मेट्रो सेवा आता 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नवे नियोजन समोर आले आहे. वारंवार बदलणाऱ्या डेडलाईन्समुळे प्रवाशांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

नेमका विलंब का झाला?
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात अनेक बाह्य आणि तांत्रिक अडचणींचा अडथळा निर्माण झाला. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक कामगार गावी गेल्याने कामाचा वेग मंदावला. पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्प परिसरात मोठी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरू आहे, ज्यामुळे बांधकामात अडथळे येत आहेत.

नवे वेळापत्रक काय आहे?

  • पीएमआरडीएने (PMRDA) दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो सेवा आता दोन टप्प्यांत सुरू होईल:
  • पहिला टप्पा (15 जून): सुरुवातीला एकूण 23 पैकी 12 स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.
  • दुसरा टप्पा (ऑक्टोबर): उर्वरित 11 स्थानकांवरील काम पूर्ण करून संपूर्ण मार्गिका ऑक्टोबरमध्ये प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

प्रशासकीय हालचालींना वेग
पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली असून, जलवाहिनीची दुरुस्ती आणि स्थानकांसाठी आवश्यक जागा तातडीने मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. टाटा-पुणे आयटी सिटी मेट्रो कंपनीकडून अंतिम प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल, असे आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

नेत्यांच्या घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2026 ची डेडलाईन दिली होती. त्याआधीही सप्टेंबर 2025 पासून अनेकवेळा मुहूर्त जाहीर झाले, मात्र प्रत्येक वेळी काम अपूर्ण राहिल्याने प्रकल्प लांबणीवर पडला. हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, मात्र आता 15 जूनची नवी तारीख तरी पाळली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!