Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai : गरबा खेळात राडा! अंधाराचा फायदा घेत अंड्यांची फेकाफेक; मीरारोडमधील घटना

Mumbai : गरबा खेळात राडा! अंधाराचा फायदा घेत अंड्यांची फेकाफेक; मीरारोडमधील घटना

भाईंदर : मीरारोड हटकेश भागातील जे.पी. नॉर्थ गृहसंकुलमध्ये गरबा खेळात सहभागी झालेल्या काही नागरिकांवर अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास गरबा खेळत असताना अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे. यामुळे परिसरातील नागरिक भलतेच संतापले आहेत.त्यांनी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जे.पी. नॉर्थ इमारतीत गरबा आयोजित करण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे मोहसीन खान या रहिवाशाने ११२ वर तक्रार केली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, १०:५० वाजताच्या सुमारास गरबा खेळण्याच्या जागी अंडी व टोमॅटो फेकल्याचा प्रकार घडला. स्थानीय नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून मोहसीन खान सारख्या व्यक्तीने काहीतरी खाली फेकले. थोड्याच वेळात दोन फुटलेली अंडी पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ आढळली. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.

धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलीस घटनास्थळी धाव घेतली. अनेक राजकीय नेते आणि हिंदूवादी संघटनांनी संकुलात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. काहींनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर काहींनी शांततेचे आवाहन केले. रहिवाशांनी मोहसीन खानवर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार सहन केले जाणार नाही असा इशारा दिला.

त्याला प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडताना मोहसीन खान यांनी सांगितले की, गरबावेळी ते सोसायटीच्या प्रांगणात उभे होते आणि त्यांच्या तिन्ही खिडक्यांवर जाळी असल्यामुळे काहीही फेकले जाऊ शकत नाही. त्याशिवाय, त्यांनी आरोप केला की, येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून होत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!