Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘हक्कासाठी लढा, पण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका…’; पंकजा मुंडे यांचे तरुणांना आवाहन

‘हक्कासाठी लढा, पण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका…’; पंकजा मुंडे यांचे तरुणांना आवाहन

मुंबई: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वांगदरी गावातील भरत कराड यांच्या आत्महत्येने राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. वृत्तानुसार, भरत यानी ही आत्महत्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून केली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. तसेच त्यांनी सर्व समाजातील तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.

भरत कराड यांनी म्हटलं आहे की, ‘भरत कराड यांच्या मृत्यूने माझे मन खूप दुखावले आहे. अशा बातम्या मनाला पिळवटून टाकतात. जीवनात संघर्ष असतो. परंतु, त्यावर आत्महत्या हा कधीच पर्याय नसतो. हक्कांसाठी लढा द्या, आवाज उठवा, परंतु आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका.’

पंकजा मुंडे यांनी पुढे सांगितले की, ‘गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षशील वृत्तीने त्यांना नेहमीच धैर्य शिकवले आणि तेच संस्कार आता घराघरांत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. कुठलीही परिस्थिती असो, धैर्याने सामोरे जा. आत्महत्येपूर्वी कुटुंब, अपले स्वप्न, आणि समाज यांचा विचार करा, असं त्यांनी आवाहन केलं.

पंकजा मुंडे यांच्या या संदेशातून आईची माया, नेत्याची जबाबदारी आणि समाजाप्रतीची संवेदना स्पष्ट दिसते. त्यांनी सर्व जाती-धर्मातील तरुणांना विनंती केली आहे की, हक्कांसाठी लढताना कधीच जीव देऊ नका. त्वरित मदतीसाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा मानसिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!