Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather: अवकाळीनंतर आता उष्णतेची लाट! पुढील 48 तास खूप महत्त्वाचे… तापमानात 2 ते 3 टक्क्यांच्या वाढची शक्यता

Maharashtra Weather: अवकाळीनंतर आता उष्णतेची लाट! पुढील 48 तास खूप महत्त्वाचे… तापमानात 2 ते 3 टक्क्यांच्या वाढची शक्यता

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली. दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत तापमानात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच पुणे, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात हवामान 32 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पावसानंतर आता विदर्भातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान 41 ते 42 अंश सेल्सियस पर्यंत वाढू शकते, असा अंदाज आहे.

दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातही अशीच स्थिती राहू शकते. परंतु मराठवाड्यातील लातूरसारख्या काही भागात 9 एप्रिल रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढू शकतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!