Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देखील सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आज त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, जय पवार आणि अन्य वरिष्ठ नेते देखील असल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय ट्वीट केले आहे ते, जाणून घेऊयात.

अमित शहा यांचे ट्वीट काय?

मी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आपले दिवंगत स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही.

तथापि, राज्याच्या कल्याण आणि विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ज्यामध्ये तुमचा संकल्प खूप उपयुक्त ठरेल.

पार्थ पवारांना राज्यसभा मिळण्याची शक्यता

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार राज्यातील राजकारणामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे राज्यसभा खासदारकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. या दृष्टीने देखील सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पार्थ पवारांच्या राजकीय भविष्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिले स्थान पटकावले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यापूर्वी, भाजपने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विक्रमी जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले होते. 731 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवार गट 167 जागांसह दुसऱ्या जागेवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी अजित पवार गट देखील तितकाच महत्त्वाचा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!