Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नितेश राणे – उदय सामंतामध्ये भगवा मफलरवरून कलगीतुरा तापला; कोकणातील वर्चस्वासाठी राजकीय टोलेबाजी

नितेश राणे – उदय सामंतामध्ये भगवा मफलरवरून कलगीतुरा तापला; कोकणातील वर्चस्वासाठी राजकीय टोलेबाजी

Nitesh Rane and Uday Samant : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात राजकीय उष्णतेचा धोका वाढत असून, मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे (भाजप) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (शिवसेना) यांच्यातील कलगीतुरा थांबण्याचं नावच घेत नाही. रत्नागिरीतील वर्चस्व आणि स्थानिक राजकारणावरून सुरू असलेल्या या वादाला आता ‘मफलर’ हा नवीन वळण मिळालंय. नितेश राणेंनी उदय सामंतांना भगवा मफलर वापरण्याचा सल्ला देत टोला लगावला, तर सामंतांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या वक्तव्यावरून आपलं रत्नागिरीशी असलेलं नातं आणि सेवाभावी कार्याचा उल्लेख केला. या राजकीय टोलेबाजीमुळे कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापलंय.

मफलर विवाद कसा सुरू झाला?

चार दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी रत्नागिरीतल्या एका कार्यक्रमात उदय सामंत यांना अप्रत्यक्षपणे उद्देशून टोला लगावला. “सद्या रत्नागिरीत मफलर वाले फिरत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरावे,” असं म्हणत राणे यांनी रंगीबेरंगी मफलर वापरणाऱ्यांवरून सामंतांना चिमटा काढला. याबाबत बोलताना राणे म्हणाले, “रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा. पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टॉक असल्याचं सांगत, उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला टोला.” हा टोला वाटद खंडाळा औद्योगिक वसाहतीवरून सुरू असलेल्या वादाशी जोडलेला असल्याचं दिसतंय.

नितेश राणे यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर आणि स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राणे यांनी पुढे सांगितलं की, कोकणात रोजगार वाढवण्यासाठी रिफायनरी आणि वाटद औद्योगिक वसाहत सारखे प्रकल्प आवश्यक आहेत. “रत्नागिरी जिल्ह्यात कुणीही प्रकल्प आणला तरी त्याचं स्वागत केलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी सांगितलं की, “ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण शासन देणार आहे.” हा मुद्दा कोकणातील सामाजिक राजकारणातही महत्त्वाचा ठरतोय.

उदय सामंतांचं जोरदार प्रत्युत्तर

नितेश राणेंच्या टोल्याला उदय सामंत यांनीही तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर दिलं. “भगवी शाल दिली ते बरं केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली. भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते,” असं म्हणत सामंतांनी आपली हिंदुत्वाची ओळख अधोरेखित केली. पुढे ते म्हणाले, “मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सेवाभावी संस्थांमधून मी मोठा झालो आहे.” सामंत यांनी राणेंच्या मफलर टोल्याकडे दुर्लक्ष देत आपलं रत्नागिरीशी असलेलं दीर्घकालीन नातं आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करून वादाला नवं वळण दिलं.

उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार असून, शिवसेनेतर्फे कोकणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असून, त्यांचं कुटुंब (नारायण राणे वरचं) कोकणात मजबूत पायाभूत असल्याने हा वाद वाढत असल्याचं दिसतंय.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!