Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

छत्रपती संभाजीनगर हादरलं! केअरटेकर आणि शिपायाकडून गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर हादरलं! केअरटेकर आणि शिपायाकडून गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण

Chhatrapati Sambhajinagr: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही कर्मचाऱ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही धक्कादायक दृश्यं कैद झाली आहेत. कुकरच्या झाकणाने, लाथा-बुक्क्यांनी आणि चापट मारून या निरागस विद्यार्थ्यांचा निर्दयपणे छळ करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील सर्वच स्तरांतून मानवतेचा अंत झालाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निरागस लेकरांवर अत्याचार

ज्यांना स्वतःची वेदना व्यक्त करता येत नाही, अशा मतिमंद विद्यार्थ्यांवर सहानुभूतीऐवजी हिंसा करण्यात आली. जे हात त्यांना आधार देण्यासाठी होते, तेच हात अत्याचार करणारे बनले. या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे. दीपक इंगळे, गेल्या 10 वर्षांपासून शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तथापि, प्रदीप देहाडे, संस्थेतील काळजीवाहक असून, तोदेखील विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

या घटनेनंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितलं की, दोन्ही आरोपींविरोधात कायद्यानुसार कडक कारवाई केली जात आहे. तसेच, संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू आहे.

मंत्री अतुल सावे यांची संतप्त प्रतिक्रिया

 

ही घटना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात घडल्याने प्रशासनावर टीका होत आहे.  सावे यांनी म्हटलं आहे की, या संस्थांमध्ये सरकारने या मुलांच्या काळजीसाठी विश्वासाने सुविधा उभ्या केल्या आहेत. पण जर ह्याच संस्था छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. या मुलांना दया नको, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी. त्यांच्या अश्रूंनी शासन आणि समाज दोघांचीही मने हळहळली पाहिजेत नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण कायमचं बंद होईल. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि संस्थेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!