Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण पुढच्या आठवड्यात?

समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण पुढच्या आठवड्यात?

मुंबई : मुंबई ते नागपूर या ७०० किमी मार्गादरम्यानचा प्रवास अवघ्या ८ तासांत करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, तरीही लोकार्पणाचा मुहूर्त अजूनही ठरलेला नाही. पुढील आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मात्र निश्चित तारीख स्पष्ट केलेली नाही.

मार्च महिन्यात या मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. १०० दिवसांच्या कृती आराखडयाची कामे आणि विविध कामांच्या लोकार्पणाचा लगबग यामुळे मुंबई ते नागपूर सुसाट प्रवासाचे स्वप्न लांबवणीवर पडले आहे. आमणे ते वडपे दरम्यानच्या ४ किमी मार्गावरील कामही शेवटच्या टप्प्यात आले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नागपूर आणि शिर्डी दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिर्डी आणि भरवीर दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!