Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिंडोरीत शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत धुसफूस; वरिष्ठ स्तरावर एकजूट नसल्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप

दिंडोरीत शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत धुसफूस; वरिष्ठ स्तरावर एकजूट नसल्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप

दिंडोरी: तालुका शिवसेना शिंदे गटाची बैठक माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पक्ष संघटन, राजकीय रणनीती आणि कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. मात्र, बैठकीत गटबाजीची धुसफूस आणि पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूर प्रकर्षाने उमटला.

यावेळी बोलताना धनराज महाले म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून त्यांच्या नेतृत्वात अनेकजण शिवसेनेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे गटबाजी दूर करून पक्ष संघटना मजबूत करत सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे.

तसेच महायुतीत लढायचे की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, मात्र प्रत्येक जागेसाठी सक्षम उमेदवारांची तयारी आतापासूनच हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, तालुकाप्रमुख किशोर कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख वैभव महाले आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे यांनी मानले.

गटबाजी अन् एकत्र येण्याची भावना

बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी गटबाजीचे स्पष्ट उल्लेख करत, शिवसेनेत अनेक इच्छुक कार्यकर्ते येऊ पाहत आहेत, मात्र, वरिष्ठ स्तरावरील एकजूट नसल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष बळकट होत नाही, अशी खंत व्यक्त केली. काही कार्यकत्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येऊ शकतात, तर शिवसेनेचे गट का नाही? असा सवाल उपस्थित करत एकसंघतेची गरज अधोरेखित केली. मात्र, पक्षीय नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळून, सर्वांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढवण्याचे आवाहन केले.

पदाधिकाऱ्यांबाबत नाराजीचा सूर

बैठकीत काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, पक्षात काही चुकीच्या व्यक्तीना प्रवेश दिला जात आहे आणि कार्यक्षम ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच, गावपातळीवर शाखा सुरु न झाल्याने संघटनात्मक बांधणी दुर्बल राहिली आहे, अशी टीका करण्यात आली. येत्या निवडणुकीत ही नाराजी कायम राहिल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!