Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prithviraj Chavan : भारताच्या राजकारणात भूकंप? नागपूरचे लोकं पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Prithviraj Chavan : भारताच्या राजकारणात भूकंप? नागपूरचे लोकं पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. पिंपरी-चिंचवड येथे ‘जनगणमन’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होईल आणि पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधानपदावर विराजमान होईल, असा सनसनाटी दावा केला. हा दावा त्यांनी अमेरिकेतील जेफ्री एपस्टाइन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी जोडला आहे.

चव्हाण म्हणाले की, अमेरिकेत एपस्टाइन प्रकरणातील फाइल्स आणि गोपनीय माहिती १९ डिसेंबरला जाहीर होणार आहे. एपस्टाइन हा एक मोठा व्यावसायिक होता, ज्याने अवैध क्रियांद्वारे अनेक दिग्गज नेत्यांना अडकवले. त्याने स्टिंग ऑपरेशन करून छायाचित्रे आणि माहिती गोळा केली होती. अमेरिकन संसदेने नवीन कायदा करून ही सर्व माहिती जाहीर करण्याचे ठरवले आहे. या खुलाशांमुळे अमेरिकेत आणि भारतात मोठा धुमाकूळ उडेल, कारण अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येतील.

नागपूरच्या नेत्यांना संधी?

चव्हाणांनी स्पष्ट केले की, इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीतील कोणी पंतप्रधान होणार नाही, कारण आमची संख्याबळ कमी आहे. जर काही अघटित घडले तर भाजपमधीलच कोणी पंतप्रधान होईल आणि त्यात नागपूरशी संबंधित (मराठी) नेत्यांना संधी मिळू शकते. याआधीही चव्हाणांनी ट्विटरवर असाच दावा करत आरएसएस, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना टॅग केले होते.

एपस्टाइन फाइल्स ट्रान्स्परन्सी अॅक्टनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाला १९ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व दस्तऐवज जाहीर करावे लागतील. या फाइल्समध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे येऊ शकतात, ज्यामुळे भारतातही राजकीय उलथापालथ होईल, असा चव्हाणांचा अंदाज आहे.

या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्यांकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र चव्हाणांचा दावा कितपत खरा ठरतो, हे १९ डिसेंबरनंतर स्पष्ट होईल. चव्हाणांनी हा दावा जगातील घडामोडी आणि दिल्लीतील त्यांच्या संपर्कांचा हवाला देत केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!