Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट; पुणे पोलीस दलात खळबळ

पुणे: पुण्यातील एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय ४६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पत्नी आणि मुलगी गावी गेल्यानंतर संबंधित पोलिसांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचा का केली, याचे कारण अस्पष्ट आहे. सध्या पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुर्वे हे खडक पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पत्नी आणि मुलीसह शिवाजीनगर पोलिस वसाहतीत नवीन बिल्डिंग येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेल्याने ते सध्या एकटे घरी होते. शुक्रवारी (दि. ६) दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी सचिन सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. सुर्वे यांच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!