मेष : व्यवसायात वृद्धी झाल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील.
वृषभ : सततच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडेल.
मिथुन : ग्रहमान सुधारल्याने उत्तम दिवस राहील.
कर्क : मित्रमैत्रिणींबरोबर सहलीवर जाल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
सिंह : वरिष्ठांशी असलेले मतभेद सुधारतील. बढतीचे योग येतील.
कन्या : शाब्बासकी मिळेल. पण हुरळून जाऊ नका.
तुळ : कुलदेवतेच्या दर्शनासाठी प्रवास घडेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : अचानक धनलाभ झाल्याने ताणतणाव कमी होईल.
धनु : बुद्धिमत्तेचे कौतुक होऊन बढतीसारखे योग येतील.
मकर : शेती किंवा जागेमध्ये गुंतवणुकीस उत्तम दिवस.
कुंभ : घरामध्ये सुखवस्तूंची खरेदी होईल. खर्च प्रमाणापेक्षा जास्त होईल.
मीन : संततीशी मतभेद टाळा. कौटुंबिक कलह संभवतो


