Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देशातील वाहतूक कोंडीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १० किमी अंतरासाठी लागतात ‘इतके’ मिनिटे

देशातील वाहतूक कोंडीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १० किमी अंतरासाठी लागतात ‘इतके’ मिनिटे

पुणे : शहराला देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. टॉम टॉम (TomTom) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे पुण्यातील वाहतूक समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.

टॉम टॉम संस्थेच्या अहवालानुसार, पुण्यात वाहनचालकांना १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २० सेकंद वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत शहरातील वाहनांचा सरासरी वेग फक्त १५.१ किलोमीटर प्रतितास इतका असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

या अहवालामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ही समस्या सोडवणे हे आता शहरातील नवे कारभारी आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. नागरिकांचा वेळ, इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण यावर या वाहतूक कोंडीचा थेट परिणाम होत आहे.

दरम्यान, देशपातळीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा दुसरा क्रमांक लागल्याने शहराच्या वाहतूक नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!