Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंना मिळणार मंत्रिपद? ‘लाल दिव्या’ची उत्सुकता वाढली

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंना मिळणार मंत्रिपद? ‘लाल दिव्या’ची उत्सुकता वाढली

Sunil Shelke : मावळ तालुक्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, समाज कल्याण विभागाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

मावळला पुन्हा मिळणार ‘लाल दिवा’?

मावळ तालुक्याच्या इतिहासात यापूर्वी माजी मंत्री मदन बाफना आणि बाळा भेगडे यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’ मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

बाळा भेगडे यांच्या पराभवानंतर शेळकेंचा उदय

मावळमध्ये एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, कालांतराने भाजपने संघटन मजबूत करत राजकारणात पकड निर्माण केली. त्यानंतर अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि मावळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले.

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत मोठा राजकीय धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीतही त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही प्रभाव

लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यात शेळके यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन सातत्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे.

उपाध्यक्षपदाऐवजी मंत्रिपद?

सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठीही चर्चा होती. मात्र आता त्यांचा थेट मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना सुनील शेळके म्हणाले, “मावळच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं आहे. मंत्रिमंडळात माझा समावेश व्हावा, ही जनतेची इच्छा लवकरच पूर्ण होईल.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!