सातारा: सातारा जिल्ह्यातील वाई-मांढरदेव रस्त्यावरील पांडवगडावर (ता. वाई) गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी असून यामधील दोन जण घटनास्थळावर बेशुद्ध झाले. सर्वांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदापूरवरून हे गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज (दि. १०) सकाळी गेले होते.
गिर्यारोहकांनी लावलेल्या परफ्यूमच्या वासाने मधमाशांच्या पोळे विचलित झाले. त्यानंतर मधमाशांनी गिर्यारोहकांवर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जण बेशुद्ध झाले आहेत. ही माहिती मिळताच वाई येथील गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्याद्री बचाव पथकांनी पांडवगडावर धाव घेतली. तसेच प्रशासनाला या हल्ल्याची माहिती कळविण्यात आली आहे.


