पुणे : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहितीमिळत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सोमवारी (दि. 10) सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून संध्याकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे येत आहे.
पुण्यातील एकदम वर्दळीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण होणे ही बाब अतिशय गंभीर आणि तेवढीच चिंताजनक देखील आहे. सदर घटना सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत संबंधित घटना घडली आहे. स्वीफ्ट गाडीतून आलेल्या चार जणांनी ऋषिकेश सावंत यांचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू केला आहे.


