Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत 11 लाख दुबार मतदार! एकाच व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा; ठाकरे बंधूंच्या दाव्यावर आता निवडणूक आयोगाकडूनही शिक्कामोर्तब

मुंबईत 11 लाख दुबार मतदार! एकाच व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा; ठाकरे बंधूंच्या दाव्यावर आता निवडणूक आयोगाकडूनही शिक्कामोर्तब

Duplicate Voter In Mumbai: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच मतदारयादीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील यादीत तब्बल 11 लाखांपर्यंत दुबार नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने स्वतः कबूल केले की काही नावे दोन-तीन वेळा नव्हे, तर काही प्रकरणांमध्ये एका मतदाराचे नाव 103 वेळा नोंदवले गेले आहे.

मुंबईत एकूण 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा नोंदली गेल्याने एकत्रितपणे दुबार नोंदींचा आकडा लाखोंमध्ये गेला आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप खरे ठरल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

दुबार नावे हटवण्यासाठी विशेष मोहीम

मतदारयादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त वेळ मागण्यात आला असून, 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक 24 वॉर्डांतील निवडणूक कार्यालयांतून सहाय्यक आयुक्त या प्रक्रियेवर काम करतील. तथापि, कोणते नाव किती वेळा पुनरावृत्तीने नोंदले गेले आहे याचा स्पष्ट हिशोब प्रशासनाकडे नसल्याची कबुलीही देण्यात आली.

राज ठाकरे–उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला संयुक्त पत्र

मतदारयादीतील गोंधळ, चुकीचे विभाजन आणि माहितीतील त्रुटी याबाबत चिंता व्यक्त करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आयोगाला संयुक्त पत्र पाठवले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!