Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात खळबळ..! विश्रांतवाडीत बॉम्बसदृश जिलेटिनच्या १३८ कांड्या अन् वायर सापडल्या; चौकशी करताच सत्य समोर आलं

पुण्यात खळबळ..! विश्रांतवाडीत बॉम्बसदृश जिलेटिनच्या १३८ कांड्या अन् वायर सापडल्या; चौकशी करताच सत्य समोर आलं

पुणे : शहरातील विश्रांतवाडी परिसरात बुधवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक ८ मधील साईकृपा लॉजजवळ रस्त्यालगतच्या मोकळ्या प्लॉटच्या गेटबाहेर एका पोत्यात बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या १३८ कांड्या आणि १३५ डेटोनेटर वायर आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

आरोग्य कोठीतील सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छता करताना हे पोते रस्त्याच्या कडेला पडलेले पाहिले आणि त्यात संशयास्पद वस्तू दिसल्याने लगेच विश्रांतवाडी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बॉम्बशोधक आणि निष्क्रियकरण पथकाला (BDDS) पाचारण केले. तपासणीत एकूण १० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे साहित्य खडक फोडण्यासाठी (ब्लास्टिंग) वापरले जाणारे असून ते शिरूर येथील बांधकाम व्यावसायिकांचे आहे. मात्र हे धोकादायक साहित्य बेसावधपणे रस्त्यालगत ठेवल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

याप्रकरणी राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवते (दोघे रा. शिरूर) यांच्याविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस हवालदार यशवंत किरवे यांनी दाखल केली असून, पोउपनिरीक्षक विशाल माने तपास करत आहेत.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “घाबरण्याचं कसलंही कारण नाही. हे साहित्य दहशतवादी कटाचा भाग नाही. तरीही अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.” सध्या पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!